esakal | परकी गुंतवणुकीने किती कोटीचा गाठला टप्पा पहा
sakal

बोलून बातमी शोधा

Foreign-Investment

तेजीच्या लाटेवर स्वार होत परकी गुंतवणूकदारांकडून वर्ष २०१९ मध्ये १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. भारतीय भांडवली बाजारातील गुंतवणुकीचा गेल्या सहा वर्षांतील हा उच्चांक आहे. परकी गुंतवणूकदारांकडून मुख्यतः चांगली कामगिरी करणाऱ्या ‘लार्ज कॅप’ प्रकारातील शेअरमध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे.

परकी गुंतवणुकीने किती कोटीचा गाठला टप्पा पहा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - तेजीच्या लाटेवर स्वार होत परकी गुंतवणूकदारांकडून वर्ष २०१९ मध्ये १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. भारतीय भांडवली बाजारातील गुंतवणुकीचा गेल्या सहा वर्षांतील हा उच्चांक आहे. परकी गुंतवणूकदारांकडून मुख्यतः चांगली कामगिरी करणाऱ्या ‘लार्ज कॅप’ प्रकारातील शेअरमध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे. परकी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफपीआय) आतापर्यंत भारतीय भांडवली बाजारात ९९ हजार ९६६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. वर्ष २०१३ नंतर करण्यात आलेली ही सर्वाधिक परकी गुंतवणूक आहे. वर्ष २०१३ मध्ये १.१० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय अर्थव्यवस्थेवरील वाढत्या विश्वासामुळे चौथ्या तिमाहीत ‘एफपीआय’कडून बाजारातील गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. ऑक्‍टोबर ते डिसेंबर २०१९ या कालावधीत गुंतवणूकदारांनी ४३ हजार ७८१ कोटी रुपये भारतीय भांडवली बाजारात ओतले आहेत. याआधी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत मात्र गुंतवणुकीचा ओघ अटळ होता.

ठाकरे सरकारचा आणखी एक दणका; आता लक्ष्य ऍक्सिस बँक

गुंतवणूकदारांनी २२ हजार ४६३ कोटी रुपये बाजारातून काढून घेतले होते, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी २०१९ मध्ये ५२ हजार ८५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक म्युच्युअल फंडाद्वारे करण्यात आली आहे. 

बीएनपी परिबाच्या ताज्या अहवालानुसार, नोव्हेंबर २०१९ अखेर भारत, तैवान, कोरिया, इंडोनेशिया आणि फिलिपिन्स या सहा प्रमुख आशियाई देशांमध्ये वर्ष २०१९ मध्ये सुमारे २४ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे. वर्ष २०१८ मध्ये परकी गुंतवणूकदारांनी १६.७ अब्ज डॉलर बाजारातून काढून घेतले होते. वर्षअखेर झालेल्या परकी गुंतवणुकीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स वर्षभरात १५ टक्‍क्‍यांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १२ टक्‍क्‍यांनी वधारला आहे. दोन्ही निर्देशांकांनी दोन अंकी परतावा मिळवून दिला आहे.