बॅंकांकडून बुडीत कर्जांची विक्री 

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 जून 2018

मुंबई - बुडीत कर्जांनी हैराण झालेल्या बॅंकांनी बुडीत कर्जांची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. ताळेबंद स्वच्छ करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील सात बॅंका २८ हजार कोटींची बुडीत कर्जे ही कर्ज पुनर्रचना कंपन्यांना विक्री करणार आहेत. 

‘आयडीबीआय’ बॅंकेने ३० बुडीत खात्यांच्या कर्जांची विक्रीसाठी निवड केली आहे. या खात्यांमध्ये बॅंकेचे २१ हजार ३९९ कोटी अडकलेले आहेत. एसबीआय बॅंक १२ बुडीत खात्यांची विक्री करणार असून, यात १ हजार ३२५ कोटी थकले आहेत. आयसीआयसीआय, युको, युनियन, देना आदी बॅंकांकडून २८ हजार कोटींच्या बुडीत कर्जांची विक्री केली जाणार आहे. गेल्या दोन वर्षांत बॅंकांकडील बुडीत कर्जे १० लाख कोटींवर गेली आहेत. 

Web Title: Selling bad loans from banks