सेन्सेक्स 100 अंशांनी वधारला; निफ्टी 9100 अंशांच्या पार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 मार्च 2017

मुंबई: भारतीय शेअर बाजाराची आठवड्याच्या शेवटच्या दिवशी किंचित वाढीसह सुरुवात झाली आहे. बँकिंग, अर्थ आणि एफएमसीजी क्षेत्रातील तेजीच्या पार्श्वभूमीवर निफ्टीने पुन्हा एकदा 9100 अंशांची पातळी गाठली आहे. दरम्यान, सेन्सेक्सदेखील सुमारे 100 अंशांनी वधारला आहे  सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी सेन्सेक्स 121.64 अंशांच्या वाढीसह 29,453.80 अंशांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. दरम्यान, निफ्टी 9,119.30 अंशांच्या पातळीवर व्यवहार करत असून 33 अंशांनी वधारला आहे.

आज(शुक्रवार) लोकसभेत वस्तू व सेवा कर विधेयक मांडण्यात येणार आहे. याआधी सोमवारी या विधेयकातील चार महत्त्वाच्या मसुद्यांना मंजुरी मिळाली होती.

बाजारात आयटी, ऑईल अँड गॅस व टेक्नॉलॉजी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये दबाव दिसून येत आहे. याऊलट, ऑटो, बँकिंग, एफएमसीजी क्षेत्रात तेजीचे वातावरण आहे. निफ्टीवर बडोदा बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, आयटीसी आणि भारती एअरटेलचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर बीपीसीएल, टेक महिंद्रा, ओएनजीसी, ग्रासिम आणि टाटा मोटर्सचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत .

Web Title: sensex 100 points up now