सेन्सेक्‍सची गाडी रुळावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

निर्देशांकात १८६ अंशांची वाढ; निफ्टीही वधारला
मुंबई - बॅंका आणि वित्तसंस्थांच्या शेअर्समध्ये झालेल्या खरेदीने बुधवारी सेन्सेक्‍स तेजीच्या वाटेवर परतला. खनिज तेलातील घसरण आणि रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत सावरल्याने गुंतवणूकदारांनी चौफेर खरेदी केली. दिवसअखेर सेन्सेक्‍स १८६.७३ अंशांच्या वाढीसह ३४ हजार ३३ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ७७.९५ अंशांची वाढ होत तो १० हजार २२४ अंशांवर बंद झाला. 

सकाळपासून बाजारात तेजीचा माहौल होता. सेन्सेक्‍सने ३४ हजार अंशांची पातळी गाठली, तसेच निफ्टीने १० हजार २०० अंशांचा स्तर ओलांडला. खनिज तेलाचा भाव ४.३७ टक्‍क्‍यांनी कमी झाल्याने विमान कंपन्या आणि तेल वितरकांच्या शेअर्सची मागणी वाढली. एचपीसीएल, बीपीसीएल, इंडियन ऑइलच्या शेअर्समध्ये ६ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली. एअरटेलचा शेअर आज १० टक्‍क्‍यांनी वधारला. 

दरम्यान, कोटक बॅंक, येस बॅंक, अदानी पोर्ट, हिरोमोटो कॉर्प, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती सुझुकी आदी शेअर घसरणीसह बंद झाले. 

डॉलरच्या तुलनेत रुपया ४१ पैशांनी वधारला
चलन बाजारात रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत ४१ पैशांनी वधारून ७३.१६ वर बंद झाले. खनिज तेलाचा भाव कमी झाल्यानंतर निर्यातदारांनी डॉलरची मोठ्या प्रमाणात विक्री केली, ज्यामुळे रुपयाला फायदा झाल्याचे चलन बाजार विश्‍लेषकांनी सांगितले. गेल्या तीन आठवड्यांतील रुपयाचा हा सर्वोत्तम दर आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex