खूशखबर! गुंतवणूकदार मालामाल; शेअर बाजारात दहा वर्षातील उच्चांकी झेप

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

सरकारकडून अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी घोषणा झाल्यानंतर शेअर बाजारात शुक्रवार तेजीचे वारे संचारले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स तब्बल 1 हजार 921 अंशांची झेप घेऊन 38 हजार 14 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 569 अंशांची उसळी घेऊन 11 हजार 274 अंशांवर बंद झाला. 

मुंबई : सरकारकडून अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी घोषणा झाल्यानंतर शेअर बाजारात शुक्रवार तेजीचे वारे संचारले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स तब्बल 1 हजार 921 अंशांची झेप घेऊन 38 हजार 14 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 569 अंशांची उसळी घेऊन 11 हजार 274 अंशांवर बंद झाला. 

आज दिवसभरात सेन्सेक्‍स 2 हजार 284 अंशांनी वधारून 38 हजार 378 अंशांच्या पातळीवर गेला होता. सेन्सेक्‍स आणि निफ्टीने आज दशकभरात एकाच दिवसात झालेली सर्वाधिक वाढ नोंदविली. 

गुंतवणूकदार मालामाल 
शेअर बाजारातील तेजीत आज गुंतवणूकदार मालामाल झाले. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल आज 6.82 लाख कोटी रुपयांनी वाढले. सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल आज 145 लाख 37 हजार 378 कोटी रुपयांवर पोचले. 

तेजीची क्षेत्रे 
वाहननिर्मिती, बॅंकिंग, कॅपिटल गुड्‌स, ग्राहकोपयोगी वस्तू, वित्त, ऊर्जा, तेल व नैसर्गिक वायू, धातू आणि दूरसंचार या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात आज 9.85 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ नोंदविण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex up 1921 points Nifty closes above 11274