सेन्सेक्समध्ये 200 अंशांची वाढ; निफ्टीचा 8800 पातळीला स्पर्श

वृत्तसंस्था
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

मुंबई: भारतीय शेअर बाजाराची आज(सोमवार) सकारात्मक सुरुवात झाली. सेन्सेक्समध्ये सुमारे 200 अंशांची वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूत घडामोडींमुळे निफ्टीला तब्बल चार महिन्यांनी 8800 अंशांची पातळी गाठण्यात यश आले.

सध्या(10 वाजून 23 मिनिटे) सेन्सेक्स 204.60 अंशांच्या वाढीसह 28,445.12 पातळीवर व्यवहार करत आहे. दरम्यान, निफ्टी 8,796.50 पातळीवर व्यवहार करत असून 55.55 अंशांनी वधारला आहे.

बुधवारी होणाऱ्या पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात केली जाईल अशी बाजाराला अपेक्षा आहे. यामुळे, व्याजदरांशी निगडित बँकिंग, ऑटो आणि रिअल एस्टेट क्षेत्रात तेजी निर्माण झाली आहे. मात्र, आयटी क्षेत्र अद्याप तणावाखाली आहे.

निफ्टीवर आयसीआयसीआय बँक, अंबुजा सिमेंट्स, भारती इन्फ्राटेल, बँक ऑफ बडोदा आणि एसबीआयचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर डॉ. रेड्डीज् लॅब्स, आयडिया सेल्युलर, एचसीएल टेक, टेक महिंद्रा आणि कोल इंडियाचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत.

Web Title: sensex 200% up