शेअर बाजार जोरात!

वृत्तसंस्था
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

मुंबई: जी 20 आणि ओपेक बैठकीच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार तेजीत व्यवहार करत आहे. मागील दोन सत्रात सकारात्मक राहिलेला शेअर बाजार आजदेखील तेजीत आहे. सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 260 अंशांनी वधारून 35,771 अंशांवर आहे. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 60 अंशांनी वाढला असून सध्या 10745 पातळीवर आहे. 

सकाळच्या सत्रात, इन्फोसिस, टीसीएस आणि विप्रो या आयटी कंपन्यांसहित रिलायन्स, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक इत्यादी कंपन्यांचे शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत. तर, दुसरीकडे, येस बँक, टाटा मोटर्स, भरती एअरटेल आदी कंपन्याचे शेअर्स खाली घसरले आहेत. प्रामुख्याने, मूडीज या रेटिंग एजन्सीने काळ येस बँकेच्या पतमानांकनात घट केल्याने त्याचा विपरीत परिणाम म्हणून बँकेचा शेअर 6 टक्के खाली व्यवहार करत आहे. 

रुपया वधारला 

आंतरराष्ट्रीय चलन बाजारात डॉलच्या तुलनेत रुपया वधारताना दिसत आहे. मंगळवारी रुपयाच्या मूल्यात 10 पैशांची झालेली घसरण भरून काढून आज 15 पैशांची वाढ होऊन रुपया 70.62 पैशांवर व्यवहार करत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex up 250 pts, Nifty over 10,700