सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ; निफ्टीमध्ये 8900 अंशांच्या पार

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

मुंबई: आज देशाच्या राष्ट्रीय देशांतर्गत उत्पादनाची(जीडीपी) आकडेवारी सादर होणार असल्याने शेअर बाजाराची किरकोळ वाढीसह सुरुवात झाली. सेन्सेक्समध्ये सुमारे 30 अंशांची वाढ झाली होती. निफ्टीदेखील 8900 अंशांच्या पार स्थिर आहे. सध्या(9 वाजून 50 मिनिटे) सेन्सेक्स 21 अंशांच्या वाढीसह 28,834.30 पातळीवर व्यवहार करीत आहे. दरम्यान, निफ्टी 8,904.60 पातळीवर व्यवहार करत असून 7.90 अंशांनी वधारला आहे.

बाजारात एफएमसीजी, ऑईल अँड गॅस आणि पीएसयू क्षेत्रात किंचित दबाव निर्माण झाला आहे. इतर सर्व क्षेत्रांमध्ये मात्र सकारात्मक व्यवहार सुरु आहे. निफ्टीवर भारती एअरटेल, टेक महिंद्रा, झी एन्टरटेनमेंट, गेल आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर बीपीसीएल, आयडिया सेल्युलर, कोल इंडिया, एचयुएल आणि टीसीएसचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत.

Web Title: sensex up