सेन्सेक्‍स पुन्हा 35 हजार अंशांवर

पीटीआय
मंगळवार, 29 मे 2018

मुंबई - खनिज तेलाच्या भावातील घसरण आणि वधारलेला रुपया यामुळे शेअर बाजारातील तेजीचे वारे सोमवारी सलग तिसऱ्या सत्रात कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २४० अंशांची वाढ होऊन ३५ हजार १६५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ८३ अंशांनी वधारून १० हजार ६८८ अंशांवर बंद झाला. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचा भाव आज १.८८ टक्‍क्‍यांची घसरण होऊन प्रतिबॅरल ७५ डॉलरवर आला. यातच अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य आज ४९ पैशांनी वधारले. डॉलरचा भाव आज ६७.२९ रुपयांवर आला.

यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कॅपिटल गुड्‌स, तेल व नैसर्गिक वायू आणि आरोग्यसुविधा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात झालेल्या वाढीमुळे सेन्सेक्‍स ३५ हजार अंशांच्या पातळीवर गेला. मागील सत्राच्या तुलतेन २४० अंशांची वाढ होऊन तो ३५ हजार १६५ अंशांवर बंद झाला.

तेजीची कारणे 
    खनिज तेलाच्या भावात घसरण
    डॉलरच्या तुलतेन रुपया वधारला  
    अमेरिका-उ. कोरिया चर्चा होणार 
    आशियाई बाजारातील तेजी

तीन सत्रांतील वाढ
सेन्सेक्स  820
निफ्टी 258

Web Title: sensex on 35000