esakal | निर्देशांक पुन्हा उसळले; सेन्सेक्स पुन्हा साठ हजारांवर | Sensex
sakal

बोलून बातमी शोधा

RBI
निर्देशांक पुन्हा उसळले; सेन्सेक्स पुन्हा साठ हजारांवर

निर्देशांक पुन्हा उसळले; सेन्सेक्स पुन्हा साठ हजारांवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - रिझर्व्ह बँकेने रेपो दर स्थिर ठेवल्याने आज बाजाराला दिलासा मिळाला व निर्देशांक अर्ध्या टक्क्याच्या आसपास वाढले. सेन्सेक्स 381.23 अंश तर निफ्टी 104.85 अंश वाढला. सेन्सेक्सने आज पुन्हा 60 हजारांवर मजल मारली.

आज दिवसअखेरीला सेन्सेक्स 60,059.06 अंशांवर तर निफ्टी 17,895.20 अंशांवर स्थिरावला. आज सेन्सेक्समधील 30 प्रमुख कंपन्यांपैकी 17 शेअरचे भाव कोसळत असताना रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअरने सेन्सेक्स च्या वाढीत मोठा वाटा उचलला. रिलायन्सचा शेअर आज तब्बल 3.84 टक्के म्हणजे 98 रुपयांनी वाढून 2,670 रुपयांपर्यंत पोहोचला. आज रिलायन्ससह सेन्सेक्समधील 13 शेअरचे भाव वाढले.

हेही वाचा: MobiKwik आणणार 1900 कोटींचा IPO, SEBIची मंजुरी

इन्फोसिस ( बंद भाव 1,723 रु.), टेक महिंद्र (1,440), एचसीएल टेक (1,322), टीसीएस (3,935), टाटा स्टील (1,300), लार्सन अँड टुब्रो (1,727) यांचे भाव वाढले. तर हिंदुस्थान युनिलीव्हर (2,640), डॉ. रेड्डीज लॅब (4,849), कोटक बँक (1,935), मारुती (7,425), आयटीसी (231) तसेच टायटन, एचडीएफसी बँक यांच्या शेअरचे भाव घसरले.

आजचे सोन्याचांदीचे भाव

सोने - 46,940 रु.

चांदी - 62,320 रु.

loading image
go to top