जागतिक तेजीवर सेन्सेक्‍स स्वार 

पीटीआय
मंगळवार, 27 मार्च 2018

जागतिक पातळीवर व्यापार युद्धाची शक्‍यता कमी झाल्याने जगभरातील शेअर बाजारात मंगळवारी तेजी निर्माण झाली. यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 107 अंशांच्या वाढीसह 33 हजार 174 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही 53 अंशांनी वधारून 10 हजार 184 अंशांवर बंद झाला. 

मुंबई : जागतिक पातळीवर व्यापार युद्धाची शक्‍यता कमी झाल्याने जगभरातील शेअर बाजारात मंगळवारी तेजी निर्माण झाली. यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 107 अंशांच्या वाढीसह 33 हजार 174 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही 53 अंशांनी वधारून 10 हजार 184 अंशांवर बंद झाला. 

आज बॅंकांच्या समभागात सर्वाधिक वाढ नोंदविण्यात आली. यामध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडिया आघाडीवर राहिली. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत सरकारने 3.72 लाख कोटी रुपयांचे कर्ज उचलले होते. सरकारने हे प्रमाण कमी करीत पुढील आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत 2.88 लाख कोटी रुपयांचे कर्ज उचलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, किरकोळ चलनवाढीशी निगडित रोखे आणण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे सेन्सेक्‍समध्ये 107 अंश म्हणजेच 0.33 टक्के वाढ होऊन तो 33 हजार 174 अंशांवर बंद झाला. मागील सत्रात सेन्सेक्‍समध्ये 470 अंशांची वाढ झाली होती. 

निफ्टी आज 10 हजार 207 या दिवसभरातील उच्चांकी पातळीवर पोचला होता. नंतर नफेखोरीमुळे त्यात घसरण झाली. अखेर कालच्या तुलनेत तो 53 अंश म्हणजेच 0.53 टक्के वाढून 10 हजार 184 अंशांवर बंद झाला. आज स्टेट बॅंक ऑफ इंडिया, एशियन पेंट्‌स, पॉवर ग्रिड, इंडस्‌इंड बॅंक, टाटा स्टील, कोटक बॅंक, एचयूएल, मारुती सुझुकी, टीसीएस यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले होते. 

Web Title: Sensex, all sectoral indices off day's high