सेन्सेक्स 38 हजारांवर

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

मुंबई: मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्सने 38 हजार अंशांची ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली आहे.. सकाळच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 173 अंकांची वाढ होत 38,076.23 चा सर्वोच्च उच्चांक गाठला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने देखील नवीन उच्चांकी पातळी गाठत 11,495.20 अंशांवर पोचला. निफ्टी आणि सेन्सेक्सची आतापर्यंतची ही सर्वोच्च कामगिरी ठरली.

भारतीय कंपन्यांचे तिमाही निकाल अपेक्षेहून चांगले लागल्याने शेअर खरेदीला आणखी जोर आला आहे. विशेष म्हणजे सेन्सेक्सने 37 हजार ते 38 हजारांचा टप्पा फक्त 10 सत्रांमध्ये गाठला आहे. 26 जुलै रोजी सेन्सेक्सने 37 हजारांची नोंद केली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर जगातील प्रमुख दोन आर्थिक महासत्तांमध्ये ताणल्या गेलेल्या संबंधाने युरोपीय तसेच आशियाई बाजारावर परिणाम होत असताना भारतीय शेअर बाजाराची वाटचाल सुखावणारी आहे. 

सकाळच्या सत्रामध्ये खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बॅंकेच्या शेअरमध्ये खरेदीचा उत्साह होता. त्याचप्रमाणे   एसबीआय, आयटीसी, एचपीसीएल, बीपीसीएल, हिंदाल्को, वेदांता या कंपन्यांचे शेअर वधारले आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex breaches 38,000 for first time