सेन्सेक्स तेजीत; निफ्टी 8800 अंशांच्या पार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा पाठपुरावा करत भारतीय शेअर बाजाराची आज(शुक्रवार) मजबूत सुरुवात झाली आहे. सेन्सेक्समध्ये सुमारे 100 अंशांची वाढ झाली तर निफ्टीने सुमारे 40 अंशांची वाढ नोंदवत 8800 अंशांची पातळी गाठली.

सध्या(9 वाजून 40 मिनिटे) सेन्सेक्स 60.43 अंशांच्या वाढीसह 28,390.13 पातळीवर व्यवहार करत आहे. दरम्यान, निफ्टी 8,802 पातळीवर व्यवहार करत असून 24.45 अंशांनी वधारला आहे.

बाजारात प्रामुख्याने बँकिंग, आयटी आणि मेटल क्षेत्रात तेजीचे वातावरण आहे. याऊलट, ऑटो आणि एफएमसीजी क्षेत्रात किरकोळ घसरणीसह व्यवहार सुरु आहे. निफ्टीवर ग्रासिम, टेक महिंद्रा, कोटक महिंद्रा, बीएचईएल आणि एसबीआयचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर बीपीसीएल, झी एन्टरटेनमेंट, अरबिंदो फार्मा, आयटीसी आणि बॉशचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत.

Web Title: sensex bullion, nifty above 8800