सेन्सेक्समध्ये 270 अंशांची वाढ; निफ्टी पुन्हा 9200 अंशांच्या पार

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 एप्रिल 2017

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांमधील घसरण मागे टाकत आज(मंगळवार) शेअर बाजाराने उसळी घेतली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 250 अंशांनी वधारला असून निफ्टीने 70 अंशांची वाढ नोंदवत 9,200 अंशांची पातळी गाठली. आंतरराष्ट्रीय बाजारात संमिश्र वातावरण असूनदेखील मेटल आणि एनर्जी क्षेत्रातील तेजीने निर्देशांकांना बळ मिळाले.

मेटल क्षेत्राशिवाय एनर्जी, बँकिंग, एफएमसीजी क्षेत्रातही तेजीचे वातावरण दिसून येत आहे. सध्या(11 वाजून 1 मिनिटे) सेन्सेक्स 29,680.92 पातळीवर व्यवहार करत असून 267.26 अंशांनी वधारला आहे. दरम्यान, निफ्टी 9,213.50 पातळीवर व्यवहार करत असून 74.20 अंशांनी वधारला आहे.

निफ्टीवर हिंडाल्को, अदानी पोर्ट्स, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा आणि एसबीआयचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर कोल इंडिया, भारती एअरटेल, अंबुजा सिमेंट्स, सन फार्मा आणि महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत.

(अर्थविषयक बातम्यांसाठी क्लिक करा sakalmoney.com )

Web Title: Sensex climbs 270 points, Nifty reclaims 9,200