सेन्सेक्स 79 अंशांच्या घसरणीसह 35,158 पातळीवर बंद

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018

मुंबई: कच्च्या तेलाचे घसरते दर आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत वधारलेल्या रुपयांमुळे जागतिक बाजारांच्या तुलनेत भारतीय शेअर बाजार किरकोळ घसरण झाली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स 79.13 अंशांच्या घसरणीसह 35 हजार 158.55 अंशांवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 13.2 अंशांची घसरण नोंदवण्यात आली. निफ्टी अखेर 10 हजार 585.20 पातळीवर व्यवहार करत बंद झाला.  

मिड कॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये खरेदीचा उत्साह होता. मिडकॅप 100 निर्देशांक 1 टक्के वधारून 17 हजार 600 पातळीवर बंद झाला. तर बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक अर्ध्या टक्क्याने वधारला होता. क्षेत्रीय पातळीवर पीएसयू बँक, रिअल्टी, मेटल आणि आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली.  खासगी बॅंक, फार्मा, मीडिया, ऑटो, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि ऑईल अँड गॅस कंपन्यांच्या शेअरमध्ये खरेदीचा उत्साह होता. 

आज मुंबई शेअर बाजारात येस बँक, एचपीसीएल, इंडियाबुल्स हाउसिंग, एशियन पेंट्स, अदानी पोर्ट्स, सन फार्मा आणि हिरो मोटो यांचे शेअर प्रत्येकी 5.5 ते 2 टक्क्यांनी वधारून बंद झाले. तर इन्फोसिस, डॉ रेड्डीज, हिंडाल्को, भारती एअरटेल, गेल, टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एसबीआय या कंपन्यांच्या शेअरमध्ये 2.4 ते 1.3 टक्क्यांची घसरण झाली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex Closes 79 Points Lower, Nifty Ends At 10,585