निर्देशांकांची उच्चांकी आगेकूच  

पीटीआय
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

मुंबई - शेअर बाजारातील तेजीचे वारे सोमवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १३५ अंशांनी वाढून ३७ हजार ६९१ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २६ अंशांनी वधारून ११ हजार ३८७ अंशांवर बंद झाला. दोन्ही निर्देशांक आज ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर बंद झाले. 

बॅंकिंग, ऊर्जा, दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांवर आज खरेदीचा जोर दिसून आला. सेन्सेक्‍स आज ३७ हजार ८०५ अंशांच्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर गेला होता. याआधी १ ऑगस्टला ३७ हजार ७११ अंशांच्या उच्चांकी पातळीवर पोचला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बॅंक आणि ॲक्‍सिस बॅंकेच्या समभागात आज मोठी वाढ झाली. 

देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून वाढलेला खरेदीचा जोर आणि काही ब्लू चिप कंपन्यांचे अपेक्षेपेक्षा चांगले लागलेले तिमाही निकाल यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण झाला. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धामुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने आशियाई बाजारात आज संमिश्र वातावरण होते.

Web Title: Sensex closes just under 37700