सेन्सेक्सची विक्रमी 37 हजारांवर झेप 

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 जुलै 2018

मुंबई: शेअर बाजाराची आगेकूच कायम अजून आज (गुरुवार) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 37 हजार 026 अंशांची सर्वोच्च पातळी गाठली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने पहिल्यांदाच 11 हजार 179 अंशांची  ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली आहे. चालू वर्षात (2018) निफ्टीने 14 वेळा विक्रम मोडीत काढत नवीन उच्चांक गाठला आहे तर सेन्सेक्सने 20 वेळा नवीन उच्चांकाला गवसणी घातली आहे.

जागतिक पातळीवरील घडामोडींचे सकारात्मक पडसाद भारतीय शेअर बाजारातवर उमटत आहेत. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युरोपीय महासंघात झालेल्या महत्त्वाच्या करारामुळे जगभरातील शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. 

सध्या मुंबई शेअर बाजारात एसबीआयचा शेअर 4.27 टक्क्यांनी, भारती एअरटेल 1.49 टक्क्यांनी, आयसीआयसीआय बँक 1.44 टक्क्यांनी, टाटा मोटर्स 1.11 टक्क्यांनी व आयटीसी 0.89 टक्क्यांनी वधारला आहे. 

Web Title: Sensex Conquers 37,000 Peak