सेन्सेक्‍समधील पडझड कायम

sensex
sensex

मुंबई - बिगर बॅंकिंग वित्तसंस्थांना भेडसावणाऱ्या रोकड टंचाईवर ठोस उपाययोजना न झाल्याने गुंतवणूकदारांकडून सलग तिसऱ्या सत्रात शेअर्सची विक्री केली. त्यामुळे दिवसअखेर सेन्सेक्‍समध्ये १८१ अंशांची घट झाली. तो ३४ हजार १३४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ५८.३० अंशांची घट झाली आणि निफ्टी १० हजार २४५ अंशांवर स्थिरावला.

जागतिक घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्‍सने ८४७ अंश गमावले आहे. आज जागतिक बाजारात खनिज तेलाचा भाव पुन्हा ८० डॉलर प्रतिबॅरलपर्यंत गेला. त्यामुळे बाजारातील दबाव वाढला. तेल महाग होणे सरकारसाठी परवडणारे नसल्याने गुंतवणूकदारांची तेलाच्या किमतीवर बारीक नजर आहे. आजच्या सत्रात तेल आणि वायू, कन्झुमर ड्युरेबल्स, माहिती तंत्रज्ञान, इन्फ्रा, पीएसयू आदी क्षेत्रांत विक्रीचा मारा दिसून आला. इंड्‌सइंड बॅंकेच्या शेअरमध्ये ८.५२ टक्‍क्‍यांची घट झाली. त्याखालोखाल रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये घट झाली. 

आयसीआयसीआय बॅंक, एनटीपीसी यांच्या शेअरला मात्र मागणी होती. महागाईच्या पार्श्‍वभूमीवर बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑइल आदी शेअरला झळ बसली.

 आजच्या सत्रात मिड आणि स्मॉलकॅपवर दबाव होता. काही कंपन्यांनी निराशाजनक तिमाही कामगिरी आणि खनिज तेल महागाईचे पडसाद बाजारावर उमटले. 
- विनोद नायर, जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य विश्‍लेषक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com