सेन्सेक्‍स कोसळला

Sensex
Sensex

मुंबई - शेअर बाजारातील घसरणीचे वारे गुरुवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५७२ अंशांनी कोसळून ३५ हजार ३१२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १८१ अंशांनी गडगडून १० हजार ६०१ अंशांवर बंद झाला. 

जागतिक पातळीवरील घसरणीचे वारे, कमकुवत रुपया आणि देशांतर्गत तसेच, परकी गुंतवणूकदारांकडून निधी काढून घेण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे शेअर बाजाराला फटका बसला. धातू, तेल व नैसर्गिक वायू, औषधनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात आज सर्वाधिक घसरण झाली. सलग तिसऱ्या सत्रात आज दोन्ही निर्देशांकात घसरण नोंदविण्यात आली आहे. 

व्यापारयुद्धाचे सावट 
अमेरिका-चीन यांच्यातील व्यापारयुद्धाचा पुन्हा भडका उडण्याची शक्‍यता आहे. यामुळे जगभरातील शेअर बाजारांवर घसरणीचे सावट कायम आहे. यामुळे गुंतवणूकदार जोखीम स्वीकारण्यास तयार नाहीत, अशी माहिती विश्‍लेषकांनी दिली. याचबरोबर रशिया आणि ‘ओपेक’कडून खनिज तेल उत्पादनात कपात होणे अपेक्षित असल्याने तेलाचा भाव वधारण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com