सेन्सेक्‍सची घसरणीसह सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

मुंबई - आंतरराष्ट्रीय पातळीवरील नकारात्मक संकेतांचे पडसाद आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारावर उमटले. अमेरिका आणि चीनमधील व्यापारी युद्धाच्या भीतीने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी विक्रीला प्राधान्य दिले. यामुळे दिवसअखेर सेन्सेक्‍स २१९ अंशांच्या घसरणीसह ३५ हजार ४७०.३५ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ५९.४० अंशांची घट झाली आणि तो १० हजार ७६२.४५ अंशांच्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्‍समध्ये टाटा मोटर्समध्ये सर्वाधिक घसरण नोंदवण्यात आली.

Web Title: Sensex decrease share market