सेन्सेक्‍समधील घसरगुंडी सुरूच 

पीटीआय
मंगळवार, 22 मे 2018

नवी दिल्ली - शेअर बाजारातील घसरणीचे वारे सलग पाचव्या सत्रात सोमवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २३२ अंशांची घसरण होऊन ३४ हजार ६१६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ७९ अंशांची घट होऊन १० हजार ५१६ अंशांवर बंद झाला. 

कर्नाटकातील विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याआधीच मुख्यमंत्री व भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी शनिवारी (ता.१९) राजीनामा दिला. यामुळे कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आणि काँग्रेसचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्नाटकातील राजकीय अस्थिरतेमुळे मागील चार सत्रांत शेअर बाजारात घसरणीचे वारे आले आहे. आज पाचव्या सत्रातही हे वारे कायम राहिले. 

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात होत असलेली घसरण आणि परकी गुंतवणूकदारांकडून निधी काढून घेण्याचे वाढलेले प्रमाण यामुळेही घसरण होत आहे. 

पाच सत्रांतील घसरण 
सेन्सेक्‍स :  ९२७ 
निफ्‍टी :  २८५ 

Web Title: sensex down