सेन्सेक्‍सला ‘कर्नाटकी’ फटका

पीटीआय
गुरुवार, 17 मे 2018

मुंबई - कर्नाटकातील राजकीय अस्थिरतेचा फटका बुधवारी शेअर बाजाराला बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १५६ अंशांची घसरण होऊन ३५ हजार ३८७ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६० अंशांची घट होऊन १० हजार ७४१ अंशांवर बंद झाला. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील त्रिशंकू कौल, आशियाई शेअर बाजारातील घसरणीचे चित्र यामुळे आज गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाशी चर्चेस नकार दिल्याने कोरियन द्वीपकल्पात तणाव वाढला आहे. यामुळे ‘वॉल स्ट्रीट’वर घसरण झाली. याचाही परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर झाला. 

पीएनबी १२.१५ टक्‍क्‍यांनी घसरला 
पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) मार्चअखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत १३ हजार ४१६ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. देशातील एखाद्या बॅंकेला झालेला हा सर्वाधिक तोटा आहे. यामुळे बॅंकेच्या समभागात आज १२.१५ टक्के घसरण झाली.

Web Title: Sensex down 156 points