शेअर बाजारात पडझड

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोचल्याने सोमवारी शेअर बाजारात पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स आज २२४ अंशांची घसरण होऊन ३९ हजार ६४४ अंशावर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ७३ अंशांची घसरण होऊन ११ हजार ३५५ अंशांवर बंद झाला.

अमेरिका आणि तुर्कस्तान यांच्या संबंधांत तणाव निर्माण झाले असून, यामुळे तुर्कस्तानमध्ये आर्थिक संकट निर्माण झाले आहे. तसेच, जागतिक पातळीवरील नकारात्मक वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर सेन्सेक्‍सची सुरवात आज घसरणीने झाली. अशातच चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया घसरुन ६९.९३ या ऐतिसहासिक नीचांकी पातळीवर पोचला. यामुळे आज बॅंकिंग क्षेत्रातील समभागांच्या विक्रीवर मोठा दबाब दिसून आला. याचा सर्वाधिक फटका एसबीआय बॅंकेला बसला असून, बॅंकेचे समभाग ३.१७ टक्‍क्‍यांनी घसरले. त्यापाठोपाठ पीएनबी, येस बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, फेडरल बॅंक, ॲक्‍सिस बॅंक, एचडीएफसी बॅंक आणि आयसीआयसीआय बॅंकेचे समभाग घसरणीसह बंद झाले. 

वेदांता, रिलायन्स, एशियन पेन्ट्‌स, एनटीपीसी, टाटा स्टील, एचयूएल, मारुती सुझुकी, हिरो मोटोकॉर्प, अदानी पोर्ट आदी कंपन्यांच्या समभागामध्येही घसरण पहायला मिळाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex down 224 points