भारताच्या कारवाईमुळे सेन्सेक्स कोसळला

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

मुंबई - पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) दहशतवादी एकत्र येऊन घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराकडून सर्जिकल स्ट्राईक (नियंत्रित हल्ले) करण्यात आल्याची माहिती महासंचालक (लष्करी कारवाई) लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी दिल्यानंतर याचा शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले. सकाळच्या सत्रातील सकारात्मक कल मागे टाकत मुंबई शेअर बाजाराच निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 500 पेक्षा जास्त अंशांनी कोसळला. 

लष्कराच्या घोषणेनंतर सेन्सेक्स 572 अंशांनी कोसळून 27,719 अंशांच्या पातळीवर पोचला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 8,558 पातळीवर पोचला होता. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 180 अंशांनी वधारला होता. दरम्यान, भारतीय रुपयाचे मूल्यदेखील 36 पैशांच्या घसरणीसह 66.82 प्रति डॉलरएवढे झाले. यानंतर आता परदेशी गुंतवणूकीवरदेखील लक्ष राहील असे तज्ज्ञांचे मत आहे. 

उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 17 जवान हुतात्मा झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाकडून आज (गुरुवार) पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत रणबीरसिंग यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील हल्ल्यांबाबत माहिती दिली.

Web Title: Sensex down after India strike in PoK