सलग पाचव्या सत्रात शेअर बाजार सकारात्मक 

वृत्तसंस्था
बुधवार, 11 एप्रिल 2018

मुंबई: शेअर बाजारात आज (बुधवार) सकाळच्या सत्रात सुरुवातीला घसरण झाली. मात्र दुपारच्या सत्रात शेअर बाजार सावरला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजारचा निर्देशांक सेन्सेक्स 60.19 अंशांच्या घसरणीसहा 33 हजार 940.44  अंशांवर व्यवहार करत बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 14.9 अंशांच्या किरकोळ वाढीसह 10 हजार 417.15 पातळीवर स्थिरावला. 

आज बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि ऑईल अँड गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली. केंद्र सरकारने तेल कंपन्यांना ग्राहकांवरील भार कमी करण्यासाठी प्रतिलिटर पेट्रोलमागे 1 रुपयाचा भार उचलण्याची सूचना केली आहे. परिणामी मुंबई शेअर बाजारात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये प्रत्येकी 8 टक्क्यांची घसरण झाली आहे.  तेल विपणन कंपन्यांच्या शेअर्समध्ये हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण नोंदवण्यात आली. 

पीएसयू बँक निर्देशांकात 2.3 टक्के आणि बीएसईच्या ऑईल अँड गॅस निर्देशांकात 2.2 टक्के घसरण झाली आहे. मात्र मेटल, आयटी, ऑटो, फार्मा आणि कंझ्युमर ड्यूरेबल्स कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. 

आज मुंबई शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स डीव्हीआर, वेदांता, टीसीएस, सन फार्मा, आयशर मोटर्स आणि एचसीएल टेक कंपन्यांचे शेअर्स प्रत्येकी 4.5-1.25 टक्क्यांनी वधारून बंद झाले. तर  एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी, अदानी पोर्ट्स, एसबीआय, येस बँक, आयसीआयसीआय बँक यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक  7.7-1.2 टक्क्यांची घसरण झाली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex ends higher for 5th day