सेन्सेक्‍समध्ये ३३३ अंशांची घसरण 

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

मुंबई - चलन बाजारात डॉलरसमोर रुपयाची दमछाक आणि खनिज तेलातील महागाईचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी काल विक्रीला प्राधान्य दिले. यामुळे सलग चौथ्या सत्रात सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये घसरण नोंदविण्यात आली. सोमवारी (ता.३) दिवसअखेर सेन्सेक्‍स ३३३ अंशांच्या घसरणीसह ३८ हजार ३१२ अंशांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ९८.१५ अंशांची घट झाली आणि तो ११ हजार ५८२ अंशांवर बंद झाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex ends over 300 points lower