"सेन्सेक्‍स'ची पुन्हा घसरगुंडी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 407 अंशांनी कोसळून 34 हजार 5 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही 121 अंशांची घसरण होऊन 10 हजार 454 अंशांवर बंद झाला.

मुंबई : व्याजदर वाढीची शक्‍यता आणि जागतिक पातळीवरील शेअर बाजारांमधील घसरण याचा फटका शुक्रवारी शेअर बाजाराला बसला.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 407 अंशांनी कोसळून 34 हजार 5 अंशांवर बंद झाला. ही निर्देशांकाची 4 जानेवारीनंतरची नीचांकी पातळी आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही 121 अंशांची घसरण होऊन 10 हजार 454 अंशांवर बंद झाला. या आठवड्यात सेन्सेक्‍समध्ये 1 हजार 60 अंश आणि निफ्टीमध्ये 305 अंशांची घसरण झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टनंतर आठवडाभरात दोन्ही निर्देशांकात झालेली ही सर्वांत मोठी घसरण आहे.

Web Title: Sensex falls 407 points to 34005, Nifty at 10454