शेअर बाजारात घसरण सुरूच; सेन्सेक्स 500 अंशांनी घसरला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 मार्च 2018

मुंबई: शेअर बाजार आठवड्याच्या अखेरच्या दिवशी मोठ्या घसरणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 509 अंशांच्या घसरणीसह 33 हजार 176  अंशांवर व्यवहार करत बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 165 अंशांच्या घसरणीसह 10 हजार 195.15 अंशांवर व्यवहार करत स्थिरावला. दुपारच्या सत्रात घसरण वाढली आणि निफ्टीने  10 हजार 180.25 अंशांची दिवसभरातील नीचांकी पातळी गाठली तर  सेन्सेक्स 33 हजार 120 अंशांपर्यंत कोसळला. 

मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये देखील मोठ्या प्रमाणावर विक्रीचा मारा सुरु होता. क्षेत्रीय पातळीवर बँकिंग, ऑटो, एफएमसीजी, आयटी, मेटल, फार्मा, कॅपिटल गुड्स, पॉवर आणि ऑईल अँड गॅसच्या शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री झाली. बँक निफ्टी 1.25 टक्क्यांनी घसरून 24,500 अंशांवर बंद झाला. निफ्टीमध्ये ऑटो निर्देशांक 1.7 टक्के, एफएमसीजी निर्देशांक 1.25 टक्के, आयटी निर्देशांक 0.5 टक्के, मेटल निर्देशांक 2.4 टक्के आणि फार्मा निर्देशांकात 1.5 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. तसेच बीएसईच्या कॅपिटल गुड्स निर्देशांकात 1.7 टक्के, पॉवर निर्देशांकात 1.7 टक्के आणि ऑईल अँड गॅस निर्देशांकात 2.1 टक्के घट झाली आहे.

आज मुंबई शेअर बाजारात अल्ट्राटेक सिमेंट, आयओसी, टाटा मोटर्स, एशियन पेंट्स, टाटा मोटर्स डीव्हीआर आणि हिरो मोटो यांचे शेअर्स 3.9  ते 2.7 टक्के घसरणीसह बंद झाले. तर एचसीएल टेक, विप्रो, महिंद्रा अँड महिंद्रा, एचयूएल, टेक महिंद्रा आणि येस बँकेच्या शेअर्समध्ये प्रत्येकी 0.9 ते 0.5 टक्क्याची किरकोळ वाढ नोंदवण्यात आली. 

Web Title: Sensex falls 510 points, Nifty ends below 10,200