शेअर बाजार गडगडला; गुंतवणूकदारांचे 2.28 लाख कोटी स्वाहा

पीटीआय
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

मुंबई ः शेअर बाजारातील घसरणीचे वारे गुरुवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 572 अंशांनी कोसळून 35 हजार 312 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 181 अंशांनी गडगडून 10 हजार 601 अंशांवर बंद झाला. शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 2.28 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

जागतिक पातळीवरील घसरणीचे वारे, कमकुवत रुपया आणि देशांतर्गत तसेच, परकी गुंतवणूकदारांकडून निधी काढून घेण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे शेअर बाजाराला फटका बसला. धातू, तेल व नैसर्गिक वायू, औषधनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात आज सर्वाधिक घसरण झाली. सलग तिसऱ्या सत्रात आज दोन्ही निर्देशांकात घसरण नोंदविण्यात आली आहे. 

व्यापारयुद्धाचे सावट कायम 
अमेरिका-चीन यांच्यातील व्यापारयुद्धाचा भडका उडण्याची शक्‍यता आहे. यामुळे जगभरातील शेअर बाजारांवर घसरणीचे सावट कायम आहे. यामुळे गुंतवणूकदार जोखीम स्वीकारण्यास तयार नाहीत, अशी माहिती विश्‍लेषकांनी दिली. याचबरोबर रशिया आणि "ओपेक'कडून खनिज तेल उत्पादनात कपात होणे अपेक्षित असल्याने तेलाचा भाव वधारण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर रुपयात घसरण झाली. याचा फटका आज शेअर बाजाराला बसला. 

सर्वाधिक घसरण 
मारुती, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, येस बॅंक, अदानी पोर्टस, भारती एअरटेल, एशियन पेंट्‌स, ओएनजीसी, एचयूएल, कोटक बॅंक, इंड्‌सइंड बॅंक आणि ऍक्‍सिस बॅंकेच्या समभागात 5 टक्‍क्‍यांपर्यंत घसरण झाली. 

घसरगुंडीची कारणे 
- अमेरिका-चीन व्यापारयुद्धाचा भडका उडण्याची शक्‍यता 
- जागतिक पातळीवरील नकारात्मक स्थिती 
- डॉलरच्या तुलनेत रुपयात झालेली घसरण 
- देशांतर्गत, परकी गुंतवणूकदारांकडून निधी काढून घेण्याचा सपाटा 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex falls nearly 572 pts