सेन्सेक्‍सची त्रिशतकी झेप 

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जुलै 2018

मुंबई - कंपन्यांचे तिमाही निकाल व जागतिक बाजाराकडून मिळालेल्या सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍सने त्रिशतकी झेप घेत ३६ हजार अंशांचा टप्पा ओलांडला. दिवसाअखेर तो ३०४ अंशांच्या वाढीसह ३६,२३९.६२ अंशांवर स्थिरावला. सेन्सेक्‍सची ही गेल्या पाच महिन्यांतील उच्चांकी पातळी ठरली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ९४.३५ अंशांच्या वाढीसह १०,९४७.२५ अंशांवर बंद झाला. देशातील वाहन विक्रीत ३७.५४ टक्‍क्‍यांची वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज ऑटो शेअरमध्ये तेजी दिसून आली.

मुंबई - कंपन्यांचे तिमाही निकाल व जागतिक बाजाराकडून मिळालेल्या सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍सने त्रिशतकी झेप घेत ३६ हजार अंशांचा टप्पा ओलांडला. दिवसाअखेर तो ३०४ अंशांच्या वाढीसह ३६,२३९.६२ अंशांवर स्थिरावला. सेन्सेक्‍सची ही गेल्या पाच महिन्यांतील उच्चांकी पातळी ठरली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ९४.३५ अंशांच्या वाढीसह १०,९४७.२५ अंशांवर बंद झाला. देशातील वाहन विक्रीत ३७.५४ टक्‍क्‍यांची वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज ऑटो शेअरमध्ये तेजी दिसून आली. रिलायन्स-बीपीने १५ शहरांत गॅस वितरण परवान्यांसाठी बोली लावल्यामुळे आज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सला सर्वाधिक मागणी होती. आरोग्य सुविधा वगळता इतर सर्व क्षेत्रांतील बहुतांशी कंपन्यांचे शेअर्स वधारून बंद झाले.

Web Title: Sensex gain