शेअर बाजार सावरला; सेन्सेक्समध्ये 200 अंशांची तेजी

वृत्तसंस्था
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

मुंबई: गेल्या आठवड्यातील मोठ्या घसरणीनंतर आज (सोमवार ) शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या सत्राची सुरुवात तेजीने झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 200 अंशांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 60 अंशांनी तेजीत आहे. सेन्सेक्स 215अंशांनी वधारला असून 34 हजार 221.26 पातळीवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टी 10 हजार 514.55 पातळीवर आहे.

क्षेत्रीय पातळीवर सर्वच क्षेत्रात सकारात्मक व्यवहार सुरु आहेत. सार्वजनिक क्षेत्रतील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेला (एसबीआय) मोठा तिमाही तोटा झाला आहे. परिणामी एसबीआयच्या शेअरमध्ये इंट्राडे व्यवहारात दोन टक्क्यांची घसरण झाली आहे. सध्या राष्ट्रीय शेअर बाजारात टाटा स्टील, ओएनजीसी, अरबिंदो फार्मा, लुपिन आणि टाटा मोटर्सचा शेअर सर्वाधिक तेजीत आहे. तर एचसीएल टेक, बीपीसीएल, एसबीआय, हिंद पेट्रोच्या शेअरमध्ये प्रत्येकी 2.9 ते 0.91 टक्क्यांची घसरण झाली आहे.

Web Title: Sensex holds 200 pts gains; all sectoral indices in the green