सेन्सेक्‍समध्ये किरकोळ वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

मुंबई - महत्त्वाच्या शेअर्सच्या खरेदीने सेन्सेक्‍समधील तेजी बुधवारी (ता. २) कायम राहिली. दिवसअखेर तो १६ अंशांच्या वाढीसह ३५ हजार १७६.४२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत मात्र २१ अंशांची घसरण झाली आणि तो १० हजार ७१८.०५ वर बंद झाला. 

कॉर्पोरेट्‌सच्या तिमाही निकालांच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांचा खरेदीकडे कल आहे. एप्रिलमधील वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) विक्रमी महसूल आणि वाहन विक्रीची दमदार आकडेवारी यामुळे बाजारातील तेजीला बळ मिळाले. सकाळच्या सत्रात सेन्सेक्‍सने १९७ अंशांची झेप घेतली होती.

सेन्सेक्‍सने गेल्या तीन सत्रांत ६५९ अंशांची कमाई केली आहे. पीएसयू, धातू आदी क्षेत्रांतील शेअर्सला विक्रीचा फटका बसला. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोमवारी २६१.९८ कोटींचे शेअर्स खरेदी केले. परकी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआय) मात्र विक्रीच्या मूडमध्ये आहेत. ‘एफआयआय’ने सोमवारी ३८५ कोटींची विक्री केली. मुंबई शेअर बाजारात कोटक बॅंक, आयटीसी, एशियन पेंट्‌स, एचडीएफसी, एचडीएफसी बॅंक, ॲक्‍सिस बॅंक आदी शेअर्स तेजीसह बंद झाले. ऑटो क्षेत्रात मात्र नफावसुली दिसून आली. त्यामुळे मारुती सुझुकी, हिरो मोटो कॉर्प, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा आदी शेअर घसरणीसह बंद झाले. एचयूएल, एसबीआय, सन फार्मा, येस बॅंक, इंड्‌सइंड बॅंक, कोल इंडिया आदी शेअर्सच्या किमती घसरल्या. आशियातील बहुतांश प्रमुख शेअर बाजारांच्या निर्देशांकात घसरण नोंदवण्यात आली. युरोपातील बाजारात मात्र तेजी दिसून आली.

Web Title: sensex increase