सेन्सेक्‍समध्ये किरकोळ वाढ 

पीटीआय
बुधवार, 9 मे 2018

मुंबई - आशियातील सकारात्मक वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेअर बाजारात मंगळवारी सकाळच्या सत्रात गुंतवणूकदारांनी चौफेर खरेदी केली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍समधील वाढ नफेखोरीमुळे शेवटपर्यंत टिकली नाही. दिवसअखेर तो केवळ आठ अंशांच्या किरकोळ वाढीसह ३५ हजार २१६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी दोन अंशांची वाढ होऊन १० हजार ७१७ अंशांवर बंद झाला. 

शेअर बाजारात बॅंकांच्या समभागांवर खरेदीचा जोर होता. यामुळे एसबीआय, ॲक्‍सिस बॅंक आदी समभाग वधारले. खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बॅंकेच्या समभागामध्ये ७ टक्‍क्‍यांची वृद्धी झाली.

Web Title: sensex increase