सेन्सेक्‍स तेजीच्या लाटेवर स्वार

sensex
sensex

मुंबई - कॉर्पोरेट्‌सचे दमदार तिमाही निकाल, मजबूत रुपया आणि सकारात्मक आर्थिक घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी सेन्सेक्‍सने ३५ हजारी शिखराला पुन्हा एकदा गवसणी घातली. गुंतवणूकदारांनी चौफेर खरेदी केल्याने निर्देशांक २९७.३८ अंशांच्या वाढीसह ३५ हजार १६२ अंशांवर स्थिरावला. निफ्टीत ७२.२५ अंशांची वाढ झाली आणि तो १० हजार ५८४ अंशांवर बंद झाला. तेल आणि वायू, पायाभूत सेवा, रिअल्टी, पीएसयू, भांडवली वस्तू, बॅंकिंग आदी क्षेत्रांतील महत्त्वाच्या शेअर्सला मागणी दिसून आली. दरम्यान, चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया ३५ पैशांनी वधारून ७३.४८ वर बंद झाला. कच्च्या तेलाचे भाव घसरल्याने स्थानिक चलनाला बळ मिळाल्याचे विश्‍लेषकांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com