सेन्सेक्‍स तेजीवर स्वार

पीटीआय
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

मुंबई - शेअर बाजारातील तेजीचे वारे सलग पाचव्या सत्रात बुधवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३५८ अंशांची उसळी घेऊन ३६ हजार ९७५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १२८ अंशांनी वधारून ११ हजार ६२ अंशांवर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांनी पाच महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठली आहे.

रिझर्व्ह बॅंकेची पतधोरण आढावा बैठक काल (ता.२) सुरू झाली. उद्या (ता.७) पतधोरण आढावा बैठकीतील निर्णय जाहीर होणार आहेत. बैठकीत सकारात्मक निर्णय होण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये आज उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. परकी गुंतवणूकदारांकडून खरेदीचा जोर कायम राहिल्याने वित्तीय सेवा, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, वाहननिर्मिती आणि धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात आज मोठी वाढ नोंदविण्यात आली.  

बजाज फायनान्स, टाटा स्टील, ओएनजीसी, बजाज ऑटो, आयसीआयसीआय बॅंक, एनटीपीसी, कोल इंडिया, एम अँड एम आणि आरआयएल यांच्या समभागात ४.३४ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली. याचवेळी इंडसइंड बॅंक आणि ॲक्‍सिस  बॅंकेच्या समभागात घसरण नोंदविण्यात आली.

सर्वच क्षेत्रांतील समभागांवर खरेदीचा जोर वाढल्याने देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये सुमारे एक टक्का वाढ नोंदविण्यात आली. रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण आणि परकी निधीचा वाढलेला वेग यामुळे बाजारात तेजी निर्माण झाली. 
- विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex Increase