निर्देशांकाची त्रिशतकी झेप

पीटीआय
मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019

मुंबई - आंतरराष्ट्रीय पातळीवरील सकारात्मक संकेताच्या पार्श्वभूमीवर स्थानिक व परकी गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स आज ३४१ अंशांची झेप घेत ३६,२१३.३८ अंशांवर स्थिरावला. याबरोबरच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने १०,८०० ची पातळी ओलांडली. तो ८८ अंशांच्या वाढीसह १०,८८०.१० अंशांवर बंद झाला. 

व्यापार युद्धाला दिलेल्या विरामाची मुदत आणखी वाढवणार असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. या पार्श्वभूमीवर जगभरातील प्रमुख बाजारांमध्ये आज तेजीचे वातावरण होते. रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत झाल्याने गुंतवणूकदारांना आणखी बळ मिळाले. परिणामी त्यांनी आयटी, फायनान्स आदी समभागांची जोरदार खरेदी केली. येस बॅंकेचा शेअर आज सर्वाधिक ३.२४ टक्‍क्‍यांनी वधारला. त्यापाठोपाठ टीसीएस, इन्फोसिस, इंडसइंड बॅंक, सन फार्मा, बजाज ऑटो, मारुती सुझुकी, ॲक्‍सिस बॅंक आदी शेअर तेजीसह बंद झाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex Increase