सेन्सेक्‍सकडून नवे शिखर सर

Sensex
Sensex

मुंबई - वस्तू आणि सेवा कर कपातीने उत्साहित झालेल्या गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने सोमवारी (ता.२३) सेन्सेक्‍सला नव्या उच्चांकावर नेले. दिवसअखेर निर्देशांकाने २२२.२३ अंशांच्या वाढीसह ३६ हजार ७१८ अंशांवर स्थिरावला. सेन्सेक्‍सचा आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ७४.५५ अंशांची वाढ झाली असून, तो ११ हजार ८४ अंशांवर बंद झाला. आजच्या तेजीत एफएमसीजी आणि बॅंकांचे शेअर आघाडीवर होते.

‘जीएसटी’ कपातीने बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण होणार असून, ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादकांच्या विक्रीला चालना मिळण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी सकाळपासून खरेदीला प्राधान्य दिले. एचयूएल, आयटीसी, एशियन पेंट्‌स, वेदांता, एअरटेल, अदानी पोर्ट, मारुती सुझुकी आदी शेअर वधारले. बुडीत कर्जांवर तोडगा काढण्यासाठी बॅंकांनी वित्त संस्थांबरोबर सामंजस्य करार केला आहे. परिणामी, आयसीआयसीआय बॅंक, एसबीआय, ॲक्‍सिस बॅंक आणि कोटक बॅंक आदी बॅंकांचे शेअर तेजीसह बंद झाले. यापूर्वी सेन्सेक्‍सने १२ जुलै रोजी ३६ हजार ५४८.४१ अंशांचा उच्चांक स्थापित केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com