गुंतवणूकदारांवर लक्ष्मीकृपा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

सेन्सेक्‍समध्ये ४४२, तर निफ्टीत १३४ अंशांची वाढ
मुंबई - जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने सेन्सेक्‍सने सोमवारी विक्रमी झेप घेतली. 

सेन्सेक्‍समध्ये ४४२, तर निफ्टीत १३४ अंशांची वाढ
मुंबई - जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने सेन्सेक्‍सने सोमवारी विक्रमी झेप घेतली. 

गेल्या पाच महिन्यांत एका सत्रात निर्देशांकाने तब्बल ४४२ अंशांची झेप घेतली. दिवसअखेर तो ३८ हजार ६९४.११ अंशांच्या ऐतिहासिक उच्चांकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १३४.८५ अंशांच्या वाढीसह ११ हजार ६९१.९५ अंशांवर बंद झाला. आजच्या तेजीने गुंतवणूकदार किमान एक लाख कोटींनी मालामाल झाले. फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढीबाबत केलेले भाष्य आणि चीनच्या केंद्रीय बॅंकेने चलन स्थिरतेसाठी उचललेले पाऊल या घडामोडींनी जागतिक शेअर बाजारांचा नूर पालटला. स्थानिक तसेच परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी खरेदीचा ओघ वाढवला. 

दुसरी मोठी झेप
सेन्सेक्‍सने यापूर्वी पाच एप्रिलला ५७७.७३ अंशांची झेप घेतली होती. निफ्टीने १९६.७५ अंशांची झेप घेतली होती. आजच्या सत्रात निफ्टीने ११ हजार ७०० अंशांचा पल्ला गाठला होता.

Web Title: Sensex Increase Investor