सेन्सेक्‍समधील तेजी नफेखोरीने रोखली  

पीटीआय
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

मुंबई - गेल्या दोन सत्रांतील वधारलेल्या ब्लूचिप समभागांमध्ये नफेखोरी झाल्याने बुधवारी शेअर बाजारातील तेजीला ब्रेक लागला. 

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स दिवसअखेर १७३ अंशांच्या घसरणीसह ३८ हजार ७२२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४६ अंशांची घट होऊन ११ हजार ६९१ अंशांवर बंद झाला. आजच्या सत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागामध्ये १.८ टक्‍क्‍यांची घट झाली. कोल इंडिया, इन्फोसिस, एचडीएफसी बॅंक, येस बॅंक, इंड्‌सइंड बॅंकेच्या समभागांना नफेखोरीचा फटका बसला. चलन बाजारात डॉलरसमोर रुपया घसरल्याचे पडसाद शेअर बाजारात उमटले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex Increase Profit