सेन्सेक्‍स, निफ्टीची घसरगुंडी सुरूच

Sensex
Sensex

मुंबई - वायदेपूर्तीच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या नफेखोरीने शेअर बाजारातील पडझड गुरुवारी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २१८ अंशांच्या घसरणीसह ३६ हजार ३२४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही ७६ अंशांची घट होऊन १० हजार ९७७ अंशांवर बंद झाला. 

आजच्या सत्रात एनबीएफसी, बॅंकांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली. येस बॅंकेच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. त्याखालोखाल मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ॲक्‍सिस बॅंक, ओएनजीसी, कोटक महिंद्रा बॅंक, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बॅंक आदी समभाग घसरणीसह बंद झाले. टीसीएसच्या समभागामध्ये मात्र वाढ नोंदविण्यात आली. बॅंकांबरोबरच औषधनिर्माण, बांधकाम, वित्त, वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com