सेन्सेक्‍सचा महिनाभराचा नीचांक 

सेन्सेक्‍सचा महिनाभराचा नीचांक 

दिवसभरांत 509 अंशांची घट, दोन लाख कोटींचा फटका 
मुंबई:  जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत आणि रुपयातील अवमूल्यनाची झळ सलग दुसऱ्या दिवशीही सेन्सेक्‍सला बसली. कमकुवत रुपया, चलनवाढीच्या भीतीने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी विक्रीला प्राधान्य दिले. एफएमसीजी, मेटल, ऑटो, टेलिकॉम, हेल्थकेअर आदी क्षेत्रांतील शेअर्समध्ये पडझड झाली. त्यामुळे सेन्सेक्‍समध्ये 509 अंशांची घट झाली आणि तो 37,413.13 अंशांवर बंद झाला. हा निर्देशाकांचा महिनाभरातील नीचांकी स्तर आहे. 


राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 150.60 अंशांच्या घसरणीसह 11 हजार 287 अंशांवर बंद झाला. आजच्या सत्रात गुंतवणूकदार दोन ते अडीच लाख कोटींनी होरपळून निघाले. अमेरिका आणि चीन व्यापारी संघर्ष, वित्तीय तूट, इंधन दरवाढ आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीची शक्‍यता, यामुळे बाजारातील वातावरण नकारात्मक बनले आहे. डॉलरसमोर रुपयाची दमछाक होत असून, तो आणखी घसरण्याचे अंदाज वर्तविले जात आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांचा पैसे काढण्यावर भर आहे. आजच्या सत्रात टाटा स्टील, पॉवर ग्रीड, आयटीसी, एचयूएल, एचडीएफसी बॅंक, एचडीएफसी, भारती एअरटेल, अदानी पोर्ट, ऍक्‍सिस बॅंक आदी महत्त्वाचे शेअर घसरणीसह बंद झाले. डॉलर वधारल्याने महसूल वाढण्याची शक्‍यता असल्याने माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिसच्या शेअरमध्ये वाढ नोंदविण्यात आली. 

ऑटो उत्पादकांकडून अपेक्षाभंग 
देशातील मोटार विक्रीत ऑगस्टमध्ये घट झाली. सलग दुसऱ्या महिन्यात वाहन उत्पादकांनी निराशाजनक कामगिरी केल्याने गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग झाला. त्यांनी ऑटो शेअर्सची जोरदार विक्री केली. हिरो मोटो कॉर्प, टाटा मोटर्स, मारुती, बजाज ऑटो आदी शेअर घसरणीसह बंद झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com