रुपया आणि शेअर बाजारात निफ्टी, सेन्सेक्सचा नवा उच्चांक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

रूपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 30 महिन्यातील उच्चांकी पातळी गाठली आहे. . शेअर बाजारातील दोन्ही मुख्य निर्देशांकांनी उच्चांकी पातळी गाठली आहे. परिणामी रुपयला बळ प्राप्त झले.

मुंबई: रूपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 30 महिन्यातील उच्चांकी पातळी गाठली आहे. रुपया डॉलरच्या तुलनेत प्रतिडॉलर 63.37 आणि 63.32 च्या दरम्यान व्यवहार करतो आहे. गुरुवारी .देखील रुपया 12 पैशांच्या वाढीने गेल्या अडीच वर्षांच्या उच्चांकीपातळीवर पोचला होता आणि स्थान 63.41 रुपये प्रतिडॉलरवर व्यवहार करत स्थिरावला. या आधी 15 जुलै 2015 रोजी रुपयाचे प्रतिडॉलर विनिमय मूल्य हे 64 रुपयांखाली होते, त्यानंतर आता पुन्हा रुपया प्रतिडॉलर 64 रुपयांच्या खाली पोचला आहे. 

गेल्या 28 डिसेंबरपासून परकी चलन विनिमय मंचावर रुपयातील तेजी कायम आहे. गेल्या गुरुवारी रुपया 64.08 पर्यंत होता. शेअर बाजारातील दोन्ही मुख्य निर्देशांकांनी उच्चांकी पातळी गाठली आहे. परिणामी रुपयला बळ प्राप्त झले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 34 हजार 175.21 अंशांची उच्चांकी पातळी गाठली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने 10 हजार 562.80 अंशांची उच्चांकी पातळी गाठली आहे. ही निफ्टी सर्वोच्च पातळी आहे. 

Web Title: Sensex, Nifty hit new record high