सेन्सेक्स आणि निफ्टी नव्या उच्चांकी पातळीवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

 मुंबई शेअर बाजारात आयसीआयसीआय बँक, भारती इन्फ्रा, झी एंटरटेनमेंट, वेदांत, ओएनजीसी, मारुती सुझुकी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि डॉ रेड्डीज यांचे शेअर्स प्रत्येकी 2.7 ते 7.7 टक्क्यांनी वधारले होते. तर  युएलएल, अरविंदो फार्मा, ल्युपिन, भारती एअरटेल, बॉश, आयटीसी, बजाज ऑटो, विप्रो आणि सन फार्मा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 1.4 ते 0.7 टक्के घसरण नोंदवण्यात आली. 

मुंबई: शेअर बाजारात आज (शुक्रवार) आठवड्याच्या अखेरच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर चढ-उतार सुरू होते. शेअर बाजार सर्वोच्च पातळीवर पोचल्यानंतर बाजारात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने आज 34 हजार 638.42 अंशांची सर्वोच्च पातळी गाठली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने 10 हजार 690.40 अंशांची सर्वोच्च पातळी गाठली. दिवसअखेर सेन्सेक्स 88.90 अंशांनी वधारून 34 हजार 592.39 पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 10 हजार 681.25 अंशांवर व्यवहार करत स्थिरावला. 

मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये देखील आज चढ-उतार सुरू होते. क्षेत्रीय पातळीवर बँकिंग, ऑटो, फायनान्शिअल सर्व्हिसेस, मीडिया, मेटल, कॅपिटल गुड्स आणि ऑईल अँड गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदीचा जोर असल्याने निर्देशांकाला बळ मिळाले. मात्र एफएमसीजी, फार्मा, पॉवर आणि कंज्यूमर ड्युरेबल्स निर्देशांकात घसरण नोंदवण्यात आली. 

आज मुंबई शेअर बाजारात आयसीआयसीआय बँक, भारती इन्फ्रा, झी एंटरटेनमेंट, वेदांत, ओएनजीसी, मारुती सुझुकी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि डॉ रेड्डीज यांचे शेअर्स प्रत्येकी 2.7 ते 7.7 टक्क्यांनी वधारले होते. तर  युएलएल, अरविंदो फार्मा, ल्युपिन, भारती एअरटेल, बॉश, आयटीसी, बजाज ऑटो, विप्रो आणि सन फार्मा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 1.4 ते 0.7 टक्के घसरण नोंदवण्यात आली. 

Web Title: sensex nifty new high