सेन्सेक्स 80 अंशांच्या घसरणीसह 28,813 पातळीवर बंद

वृत्तसंस्था
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

मुंबई: शेअर बाजारात मार्च महिन्यातील मालिकांची निराशाजनक सुरूवात झाली. अखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 80 अंशांच्या घसरणीसह 28,812.88 पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 43 अंशांच्या घसरणीसह 8,896.70 पातळीवर बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये देखील आज खरेदी-विक्री मंदावली आहे. क्षेत्रीय पातळीवर बँकिंग, ऑटो, मेटल आणि पॉवर कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या विक्रीच्या मार्‍यामुळे निर्देशांकात घसरण झाली. खाजगी क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्ये आज मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.

आज मुंबई शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीज, अरबिंदो फार्मा, लुपिन, हिंदुस्थान युनिलिव्हर, विप्रो आणि कोल इंडिया यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले होते. तर आयडिया सेल्युलर, अॅक्सिस बँक, भारती इन्फ्रा, पॉवर ग्रीड, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, मारुती आणि एल अँड टीच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली.

Web Title: sensex up now