सेन्सेक्स, निफ्टीने गाठला 52 आठवड्यांचा उच्चांक

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मार्च 2017

मुंबई: भारतीय शेअर बाजारातील निर्देशांकांनी आज(गुरुवार) 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी गाठली आहे. राष्ट्रीय देशांतर्गत उत्पादनाची(जीडीपी) सकारात्मक आकडेवारी, कंपन्यांची कामगिरी, अनुकूल अर्थसंकल्प आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दलाल स्ट्रीटवरील गुंतवणूकदारांचा उत्साह दुणावला आहे. सेन्सेक्सने सुमारे 150 अंशांच्या वाढीसह 29,132 अंशांवर 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी गाठली. निफ्टीने 9000 अंशांना स्पर्श करीत वर्षभराचा उच्चांक गाठला आहे. निर्देशांकात वर्षभरात 10 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. याआधी गेल्यावर्षी निफ्टीने 9,119 अंशांवर विक्रमी पातळी गाठली होती.

सध्या(10 वाजता) सेन्सेक्स 144.34 अंशांच्या वाढीसह 29,128.83 पातळीवर व्यवहार करत आहे. दरम्यान, निफ्टी 8,990.70 पातळीवर व्यवहार करत असून 44.90 अंशांनी वधारला आहे.

बाजारात एफएमसीजी आणि हेल्थकेअर क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रांमध्ये तेजीसह व्यवहार करत आहेत. निफ्टीवर टाटा मोटर्स, हिंडाल्को, अल्ट्राटेक सिमेंट्स, टाटा मोटर्स(डीव्हीआर) आणि भेलचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर डॉ. रेड्डीज् लॅब्स, सन फार्मा, पॉवरग्रिड कॉर्पोरेशन, आयटीसी आणि येस बँकेचे शेअर्स कोसळले आहेत.

Web Title: sensex up now