सेन्सेक्स 1000 अंशानी कोसळला 

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

जागतिक पातळीवर इतर देशातील शेअर बाजारांमध्ये झालेल्या घसरणीचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम झाला. परिणामी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 1037 अंशांची घसरण झाली तर निफ्टीमध्ये 321 अंशांची घसरण नोंदवण्यात आली.

मुंबई: जागतिक पातळीवर इतर देशातील शेअर बाजारांमध्ये झालेल्या घसरणीचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम झाला. परिणामी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 1037 अंशांची घसरण झाली तर निफ्टीमध्ये 321 अंशांची घसरण नोंदवण्यात आली.

सध्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 33 हजार 913.53 अशांवर व्यवहार करत असून त्यात 847.36 अंशांची घसरण झाली आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 250 अंशाच्या घसरणीसह 10 हजार 209.65 अशांवर व्यवहार करतो आहे.

सकाळी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्सने दिवसभरातील नीचांकी पातळी गाठली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex Plunges Over 1000 Points