सेन्सेक्‍स ३७ हजार अंशांवरून माघारी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 27 जुलै 2018

मुंबई - कॉर्पोरेट्‌सच्या दमदार तिमाही कामगिरीच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने गुरुवारी (ता.२६) सेन्सेक्‍सने ३७ हजार अंशांचा ऐतिहासिक पल्ला गाठला. मात्र, दिवसअखेर तो माघारी परतला आणि १२६.४१ अंशांच्या वाढीसह ३६ हजार ९८४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ३५.३० अंशांची वाढ झाली आणि तो ११ हजार १६७ अंशांवर बंद झाला.

जागतिक बाजारातील सकारात्मक घडामोडींनी गुंतवणूकदारांचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. अमेरिका आणि युरोपियन संघाने व्यापारी तंट्यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतल्याने जगभरातील शेअर बाजारांवर सकारात्मक पडसाद उमटले. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांबरोबरच खासगी कंपन्यांची पहिल्या तिमाहीतील समाधानकारक कामगिरी सेन्सेक्‍समधील तेजीला बळ देऊन गेली. बॅंका, फार्मा आदी क्षेत्रात खरेदी दिसून आली. ‘एसबीआय’मध्ये सर्वाधिक वाढ झाली. त्याखालोखाल आयसीआयसीआय बॅंक, ॲक्‍सिस बॅंक, एचडीएफसी, पॉवरग्रीड, ओएनजीसी, एनटीपीसी, भारती एअरटेल, हिरोमोटो कॉर्प आदी शेअर तेजीसह बंद झाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex retreated from 37 thousand points