सेन्सेक्‍स तेजीवर स्वार

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मुंबई - जागतिक पातळीवरील सकारात्मक परिस्थितीमुळे शेअर बाजारात निर्माण झालेली तेजी बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २०३ अंशांची वाढ होऊन ३५ हजार ७१६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४३ अंशांनी वधारून १० हजार ७२८ अंशांवर बंद झाला. 

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात आज मोठी वाढ नोंदविण्यात आली. टीसीएस आणि इन्फोसिस या कंपन्यांच्या समभागात ५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली. इंड्‌सइंड बॅंक, आरआयएल, पॉवर ग्रीड, एचडीएफसी बॅंक, एचडीएफसी, आयआयसीआयसीआय बॅंक, हिरो मोटोकॉर्प आणि टाटा स्टील या कंपन्यांच्या समभागात २ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ नोंदविण्यात आली. याचवेळी भारती एअरटेल, टाटा मोटर्स, ओएनजीसी, एल अँड टी, एसबीआय, कोल इंडिया आणि सन फार्मा या कंपन्यांच्या समभागात ४ टक्‍क्‍यांपर्यंत घसरण झाली. 

जागतिक पातळीवरील सकारात्मक वातावरण आणि नोव्हेंबर महिन्यातील वायदेपूर्ती या पार्श्‍वभूमीवर देशांतर्गत शेअर बाजारात तेजी दिसून आली. अनेक कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीतील निकाल निराशाजनक लागल्याने आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत निर्माण झालेली चिंता यामुळे मागील काही काळात शेअर बाजारात घसरण नोंदविण्यात आली होती, असे बाजार विश्‍लेषकांनी सांगितले. 

येस बॅंकेला फटका 
‘मूडीज’ या पतमानांकन संस्थेने येस बॅंकेचे पतमानांकन घटवून बिगर गुंतवणूक दर्जामध्ये आणले आहे. याचबरोबर बॅंकेच्या वाढीचा अंदाज स्थिरवरून नकारात्मक केला आहे. यामुळे येस बॅंकेच्या समभागात १२ टक्‍क्‍यांपर्यंत घसरण झाली. बॅंकेच्या अनेक संचालकांनी राजीनामा दिल्यामुळे बॅंकेच्या स्थितीबाबत चिंता निर्माण झाली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex rises