सेन्सेक्‍सची ३१८ अंशांची उसळी

पीटीआय
शुक्रवार, 25 मे 2018

मुंबई - माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांवरील खरेदीच्या जोरामुळे शेअर बाजारात गुरुवारी तेजीचे वारे निर्माण झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३१८ अंशांची उसळी घेऊन ३४ हजार ६६३ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही ८३ अंशांची वाढ होऊन १० हजार ५३५ अंशांवर बंद झाला. 

देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून आज शेअर बाजारात खरेदीचा जोर मोठ्या प्रमाणात राहिला. माहिती तंत्रज्ञान, धातू आणि औषधनिर्माण कंपन्यांच्या समभागांना आज मोठी मागणी होती. सेन्सेक्‍समध्ये आज सकाळपासूनच वाढ होण्यास सुरवात झाली. तो ३४  हजार ७४१ अंश या दिवसभरातील उच्चांकी पातळीवर पोचला. त्यानंतर त्यात काही प्रमाणात घसरण झाली. अखेर कालच्या तुलनेत ३१८ अंशांची वाढ होऊन तो ३४ हजार ३६६ अंशांवर बंद झाला. निर्देशांकात ५ एप्रिलनंतर एकाच दिवसात झालेली ही सर्वांत मोठी वाढ आहे. 

रुपयातील घसरणीमुळे आयटी कंपन्यांच्या समभागात तेजी 
टीसीएस, इन्फोसिस, विप्रोच्या समभागात ५.८५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ 
देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून खरेदीचा जोर कायम 
‘फेडरल रिझर्व्ह’कडून व्याजदरवाढ होण्याची शक्‍यता कमी 
टाटा मोटर्सच्या समभागात सर्वाधिक ६.५६ टक्के घसरण 
तुतिकोरिन प्रकल्पाविरोधातील आंदोलनामुळे वेदांताचा समभाग घसरला 

सेन्सेक्‍समधील सर्वाधिक वाढ 

5 एप्रिल : 577
24 मे : 318

Web Title: Sensex rises 318 points