निफ्टी उच्चांकी पातळीवर; सेन्सेक्समध्ये 150 अंशांची वाढ

वृत्तसंस्था
सोमवार, 3 एप्रिल 2017

मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक घडामोडी आणि रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराची आज(सोमवार) मजबूत सुरुवात झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सुमारे 150 अंशांनी वधारला असून निफ्टीने 9220 अंशांवर उच्चांकी पातळीला स्पर्श केला आहे.

सध्या(9 वाजून 35 मिनिटे) सेन्सेक्स 119.84 अंशांच्या वाढीसह 29,740.34 पातळीवर व्यवहार करत आहे. दरम्यान, निफ्टी 9,201.05 पातळीवर व्यवहार करत असून 27.30 अंशांनी वधारला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी भारताच्या राष्ट्रीय देशांतर्गत उत्पादनात पुढील आर्थिक वर्षात(2018) 7.7 टक्के वाढीचा अंदाज वर्तविला असून 1 जुलैपासून वस्तू सेवा कराची अंमलबजावणी होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. यामुळेही गुंतवणूकदारांमध्ये उत्साह संचारला आहे.

बाजारात आयटी आणि एफएमसीजी क्षेत्रात विक्रीचा दबाव दिसून येत आहे. दोन्ही क्षेत्रांमध्ये किरकोळ घसरणीसह व्यवहार सुरु आहे. इतर सर्व क्षेत्रांमध्ये सकारात्मक व्यवहार सुरु आहे.

निफ्टीवर रिलायन्स, अंबुजा सिमेंट्स, एसीसी, अल्ट्राटेक सिमेंट्स आणि टाटा मोटर्सचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर भारती एअरटेल, भारती इन्फ्राटेल, इंडसइंड बँक, आयडिया सेल्युलर आणि बीपीसीएलचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत.

Web Title: Sensex rises over 200 points, Nifty hits new high, Reliance shares jump 4%